‘संभ्रम’ हे बुवाबाजी, अंधश्रध्दा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगाचे चित्रण करणारे बोलके पुस्तक आहे. यात रजनीश, रमामाता, न्यायरत्न विनोद, सदानंद महाराज यांच्या प्रभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे. मीरा दातारचा दर्गा, समर्थांच्या पादुकांचा आगमन सोहळा, शिर्डीच्या साईबाबांचा रामनवमी उत्सव, काळुबाईची जत्रा, वारकरी संमेलन यांसारख्या अंधश्रध्दांच्या केंद्रावरील वातावरण डाक्यूमेंटरी पध्दतीने घडवले आहे. जैन समाजात अल्पवयीन मुलींनाही संन्यासदीक्षा दिली जाते. यलम्मास अल्पवयीन मुली सर्रास सोडल्या जातात. या अंधश्रध्दांच्या बळींचाही येथे वेध घेतला आहे. या अंधश्रध्दांचा वैचारिक परामर्ष घेणारी प्रस्तावना सुप्रसिध्द विचारवंत मे. पुं. रेगे यांनी लिहिली आहे.
please login to review product
no review added