भेटलेल्या आणि न भेटलेल्या माणसांचा एक गोफ आपल्या सर्वांच्याच मनाशी नकळत विणला जात असतो. त्या विणल्या जाणाऱ्या गोफाचा आपणही एक भाग असतो. या माणसांचं तत्काळ होणारं आकलन आणि अनुभवानं बनणारं त्यांच्याबद्दलचं आपलं मत हे या मानवी आयुष्याच्या व्यापारात चिरंतन नसतं. तरीही ते मत आणि त्या मताच्या प्रकाशात उभी रहाणारी चित्रं ही आपल्याला एक समज देतात. ज्या समाजाला कधी आपण इतिहास म्हणतो, कधी वर्तमान, तर कधी भविष्य....ज्या माणसांच्या आयुष्याबद्दल आपल्याला काही कळले असं वाटतं त्या माणसांबाबतचा हा इतिहास, हे वर्तमान, हे भविष्य आणि या तिन्ही काळात रमलेली ही, माणसं : भेटलेली, न भेटलेली.
please login to review product
no review added