ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षातल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षातल्या... वगैरे-इतिहासापुरतीच मर्यादित होऊन राहायची नसतील तर त्यांना देव हा भ्रम नाकारावाच लागेल. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षाच्या इतिहासाचा आवाका, या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या गतकालाचा, अवकाश काल असित्वातच नव्हता तेव्हाच्या सिंग्युलॅरिटीच्याही आधीचा वेध घेण्याची माणसांची कुवत आहे. हे त्यांना निरीश्वरवादातूनच समजू शकेल. संथ गतीने, पण निदान आपल्या भोवतीच्या जगाला वैचारिक, बौद्धिकदृष्ट्या खर्या अर्थाने पुढे नेणे हे निरीश्वरवादाचे काम असेल. देव एक भ्रम आहे आणि तो तसाच ओळखावा.
please login to review product
no review added