अशोक सोकाजी इंगळेला वाटल, हा आपला अजब सत्याग्रह आहे. फुल्यांनंतर शंभर वर्षीनी, आंबेडकरांची लढाई सुरू झाल्यावर पंचाहत्तर वर्षांनी आणि स्वातंत्र्यानंतर पंचवीस वर्षांनी आपल्याला हे सांग करावं लागतं आहे. ही अजब गोष्ट आहे.स्वतंत्र भारताच्या हे साठ कोटी नागरिकांनो, हे सत्याग्रह ही आपल्या देशाच्या अत्यंत शरमेची गोष्ट आहे. तेव्हा फक्त मान खाली घाला.कारण आम्ही सत्याग्रह करतो आहोत,ते पाण्यासाठी.आम्हांला माणूस म्हणून वागवा, असे आमचे म्हणणे नाही. आमचे म्हणणे एवढेच, की निदान आम्हांला तुमच्या जनावरांएवढे तरी हक द्या, तुमच्याबरोबर पाणी पिण्याचे. या देशातल्या सतरा कोटी मानवांच्या आणि, हे मनू, हे माणूसपणावर खिळा ठोकणाऱ्या महापंडिता, तुलाही नमस्कार असो.तू मरून दोन-तीन-चार हजार वर्षे झाली असतील.पण तुझे भूत अजून मानगुटीवर आहे. तुझे समंध गाडून राकण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे. ते गाडले जाणार नाही एवढ्या लवकर,याची कल्पना आहे. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे....!
please login to review product
no review added