गूढ, गहन, अतर्य गोष्टींचे आपल्याला नेहमीच आकर्षण असते. आत्म्याची शक्ती किंवा अतिंद्रिय शक्ती या गोष्टींविषयी बरेच बोलले जाते, लिहिले जाते. या पारलौकिक शक्तीच्या मदतीने भविष्याचा वेध घेता येतो, एखादया जागी अशरीरी रूपात उपस्थित राहता येते अशा अनेक कथा, दंतकथा प्रचलित असतात. मनाला होणा-या दैवी अंत:स्फुराणा, टेलीपथी हाही साहित्याला उत्तम खादय पुरवणारा विषय आहे. विजय देवधर लिखित ’इजिप्शियन ममीचे रहस्य’ हे पुस्तकही अशाच अशरीरी शक्तींची गोष्ट सांगणा-या कथांचा संग्रह आहे. अध्यात्मातील ’आत्मा’ या शुद्ध संकल्पनेला अशा साहित्यात थोडा गहिरा रंग दिला जातो आणि ’प्रेतात्मा’ किंवा ’दुष्टाला’ हे त्रास देणारे, तर चांगले आत्मा मदत करणारे, संकट दूर करणारे असे वर्णन रंगवले जाते. कथासंग्रहातील पुस्तकाचे शीर्षक असलेले ’इजिप्शियन ममी’ ही अशीच दुष्ट प्रेतात्मा आहे. जो त्याच्या संपर्कात येणा-यावर अरिष्ट ओढवून आणते किंवा त्याचा दुर्दैवी मृत्यू तरी होतो. हा घटनाक्रम कसा घडत जातो, हे नक्कीच उत्सुकता टिकवून ठेवणारे वर्णन आहे.
please login to review product
no review added