नर्मदा परिक्रमेच्या अदभुत विश्वात घेऊन जाणारं श्री. जगन्नाथ कुंटे यांचं हे दुसरं अनुभवकथन. पहिल्या तीन परिक्रमांमधील विलक्षण अनुभव त्यांनी ’नर्मदे हर हर’ या पहिल्या पुस्तकात शब्दबब्द केले. सर्व स्तरातील वाचकांनी त्याला उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला. १९९९ पासून फक्त नर्मदा परिक्रमा करीत राहिलेल्या या साधकानं ’माईच्या आज्ञेनं’ चौथी परिक्रमा केली, तिची ही कहाणी. बाहय प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाची... साधनेतील अनुभवांची... जीवनचिंतनाची. साधनेत मस्त असलेल्या साधकानं केलेली... त्याला लाभलेल्या सुगंधी आनंद-चांदण्याची सुखद-शीतल पखरण करणारी ही भावयात्रा...
please login to review product
no review added