मातीच्या ढेकळाला हात लावील तर त्याचे सोने करील आणि लाकडाच्या ओंडक्याला हात लावील तर त्याचे पोलाद बनवील अशी अद्भुत किमयागार… ध्यानीमनी नसतानाही जी झांशीसारख्या मातब्बर संस्थानची राणी झाली आणि नियतीच्या लहरी स्वभावामुळे जी अकाली विधवाही झाली, अशी एक कालपटावरची बाहुली… वैधव्यानंतरचे केशवपनासारखे जाचक निर्बंध युक्तीप्रयुक्तीने दूर सारणारी एक स्वयंभू स्त्री… संस्थाने खालसा करण्यामागचा कंपनी सरकारचा कावा 1854 सालीच ओळखून त्या सरकारचा दुटप्पीपणा वेशीवर टांगणारी पहिली भारतीय संस्थानिक… कसलेल्या इंग्रज सेनाधिका-यांनीही जिचे युद्घनेतृत्व गौरवले अशी असंख्य भारतीय क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता… झांशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या अशा विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा अप्रकाशित, अस्सल कागदपत्रांच्या आधारे घेतलेला हा वेध…
please login to review product
no review added