• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Bhumi(भूमी)

  Mauj Prakashan

 262

 978-81-7486-838-1

 ₹200

 Paper Back

 296 Gm

 5

 3


ही आहे मैथिलीची भूमी. वाल्मीकींनी जिला मर्यादापुरूषोत्तम रामाच्या पुरूषी संकुचित दॄष्टीतून रेखली, त्या मर्यादेतच अडकून न राहणा-या अशा एका आधुनिक मैथिलीची. वडिलांच्या मॄत्यूनंतर तमिळी ख्रिश्चन अईच्या संस्कारांत वाढलेली, समुद्रकिनारी वसलेल्या लहानशा गावातली ही मैथिली. तिचं आयुष्य आईच्या मॄत्यूनंतर मुंबईत आत्याकडे आल्यावर अनेक वळणांवर सरकत राहतं. पण आयुष्यातला प्रत्येक अनुभव तिला तिच्यातील अंत:स्थ स्वत्वाची जाणीव देत, कधी त्याच्याशीही संघर्ष करत, घडवत नेतो-एका अनाथ, हट्टी मुलीचं एका बुद्धिवान, समंजस नि आत्मसामथर्याच्या वळावर आयुष्याला समजून घेणा-या एका प्रगल्भ स्त्रीमध्ये रूपांतर करत. स्वत:मधल्या सर्जकशक्तीनं स्वत:ला उजळत नेणा-या या मैथिलीच्या भूमीचे हे पाझर म्हणजे तिच्या स्वत्वाचेही हुंकार. आशा बगे मराठी साहित्यक्षेत्रात अनेक वर्षं स्वत:चा ठसा उमटवणा-या लेखिकांमधील एक ठळक नाव. ’झुंबर’, ’त्रिदल’, ’सेतू’ अशा अविस्मरणीय कादंब-यांनंतरची त्यांची ही कादंबरी. एकीकडे पारंपारिकतेशी नाळ न तोडताही आधुनिक जीवन-विचारसरणीला सामोरं जाता येतं... हे वैशिष्टय जाणवून देणारं आशा बगे यांचं लेखन. नागापूरसारख्या शहरांतील वास्तव्यामुळं वैदर्भीय भाषेचा आंतरिक गोडवा त्यांच्या भाषेत झिरपलेला जाणवतो. अनेक पातळयांवरून सांधत, विस्कळत जाणारी मानवी भावबंधांची उत्कट, जिवंत स्पंदन हा त्यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष. या वैशिष्टयांनी सोकारलेली ही ’भूमी’, अंतर्मुखतेचाही एक दुर्मीळ आनंद वाचकांना प्रदान करत राहते.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update