किशोर कुमार स्वयंभू कलाकाराच जीवनदर्शन : किशोर कुमार ! रुपेरी पडद्यावरच अलौकिक व्यक्तिमत्व ! भारतीय चित्रपट सृष्टीतला रुपेरी पडद्यावरच 'स्वयंभू कलाकार- असं या अजब व्यक्तिमत्वाच एक वाक्यात वर्णन करता येईल. या चंदेरी दुनयेत गायक, अभिनेता, निर्मंता, दिग्दर्शक, कथालेखक, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक असं चौफेर योगदान देऊन विविध क्षेत्रात त्यानं स्वतःचा आगळा ठसा उमटवला. किशोरकुमारच सार आयुष्य ही अजब घटनांची चक्रावून टाकणारी एक मालिकाच होती. व्यवसायिक क्षेत्रात मानाची निरनिराळी शिखरं पादाक्रांत करत असताना दुसरीकडे व्यक्तिगत जीवनात मात्र त्याने अनेक प्रकारचे चढ उतार पाहिले.आपल्या गाण्यामुळे, अभिनयामुळे आणि मिश्कील वृत्तीमुळे करोडो चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला या कलाकाराचं वैयक्तिक जीवन मात्र एकटेपणाच्या दुःखानं झोकोळून गेलं होतं. किशोर निस्सिम दैववादी होता. अन म्हणूनच आपल्या आयुष्यातल्या सुख दुःखाच्या प्रसंगाबाबत ' Destiny Leads' एवढंच बोलून तो पूर्णविराम देऊन टाकत असे. या बहुरंगी व्यक्तिमत्वाच्या कलाकाराच्या अंतरंगात डोकावून त्याच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनाचा, त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा घेतलेला हा वेध 'कलंदर कलाकार: किशोरकुमार.'
please login to review product
no review added