समताधिष्ठित समाजनिर्मिती हा लोकशाही समाजवादी विचारांच्या संघटना व कार्यकर्त्यांच्या चळवळीचा मूळ उद्देश असतो. समाजातील संख्येने अधिक असलेल्या सर्वहारा वर्गाला संघटित करून त्यांना सामाजिक, राजकीय व सांस्कृ़तिकदृष्टय़ा सक्षम करण्याचं आव्हान स्वीकारणाऱ्या आणि त्यासाठी प्रसंगी प्रखर संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीच एकेकाळी महाराष्ट्रात होती. त्यातील एक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ समाजवादी कार्यकत्रे शांताराम चव्हाण. नाशिक शहर व परिसरातील हातगाडीवाले, चहाच्या टपरीवाले, रॉकेल, फळविक्रेते तसेच भंगार वेचणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी तब्बल ३० वष्रे एकहाती संघर्ष करणाऱ्या चव्हाण यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं 'हरवलेल्या वाटेवरचा प्रवासी' हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचताना त्यांच्या लढाऊ बाण्याचं पानोपानी दर्शन होतं.
please login to review product
no review added