‘टेनफिंगर्स फॉर गॉड’ हे पुस्तक म्हणजे डॉ. पॉल ब्रँन्ड या कर्म तपस्व्याची विलक्षण जीवनगाथा. त्यांना वैद्यकीय व्यवसायातील संतच म्हणावे लागेल. कारण आपलं संपूर्ण आयुष्य आणि वैद्यकीय ज्ञान त्यांनी जगभरातल्या अगणित कुष्ठरोग्यांच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी वेचलं. शस्त्रक्रियांद्वारे, संशोधनाद्वारे, इतरांना दिलेल्या प्रेरणेद्वारे - आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजानं दूर लोटलेल्या गरीब कुष्ठरोग्यांना दाखविलेल्या सहानुभूतीमुळे त्यांना वैद्यकीय जगतातचं नव्हे तर जनमानसातही अलौकिक किर्ती लाभली आहे. डॉ. ब्रँन्ड यांच्या व्यावसायिक आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे एक अनोखा विषय - विधात्यानेच निर्माण केलेला एक अविष्कार - वेदना. ते एका वेगळ्याच नजरेने या विषयाकडे बघतात. वेदनेचं मानवी आयुष्यातील स्थान त्यांना फार महत्त्वाचं वाटतं. ते म्हणतात, शारीरिक वेदना हे मनुष्यमात्राला परमेश्वरानं दिलेल एक वरदान आहे. वेदना आहे म्हणूनच माणूस टिकून आहे. डॉ. ब्रँन्ड हे एक शल्य विद्या विशारद तर आहेतचं, पण ते एक उत्कृष्ट शिक्षक आणि पर्यावरणवादी ही आहेत. स्वार्थ, त्याग आणि विनम्रता यांचं विलक्षण मिश्रण म्हणजेच डॉ. पॉल ब्रँन्ड!
please login to review product
no review added