साहित्यापासून संगीत-नाट्य-कलांपर्यंत आणि इतिहासापासून गडकोटांपर्यंत सगळीकडेच एका अनिवार कुतूहलानं, ओढीनं पाहणारा एक हरफनमौला.आयुष्यभराच्या वाटचालीत शोधत राहिला प्रतिभावंतांना, त्यांच्यातल्या माणसाला, इतिहासकारांना, त्यांच्यातल्या माणूसपणाला. त्याला भेटत गेले त्याचे सांगाती आणि तो झाला एक आनंदयात्री.गोनीदां, कुसुमाग्रज, विंदा, 'स्वामी'कारांपासून बमो, वपु, सुशि, खेबूडकर, ‘मृत्युंजय’कारांपर्यंत. क्रांतिकारक, लक्ष्मी सेहगल, उषा महेतांपासून प्रधानमास्तर, शेषन, अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सगळ्यांचं जिव्हाळपण त्यानं उतरवलं शब्दाशब्दांत आणि तुमच्या हाती दिलं 'सांगाती'.
please login to review product
no review added