पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी अशी की, ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्यूक फ्रान्झ फर्डिनांड याचा ग्राव्हिलो प्रिन्सिप नावाच्या एका दहशतवादी बोस्नियन तरुणाने खून केला होता. या खुनामुळे युरोपियन ऐक्याच्या एकदम ठिकऱ्या उडाल्या. सबंध ऑस्ट्रो हंगेरीमध्ये संतापाची एकच लाट उसळली आणि परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली. ऑस्ट्रिया आणि जर्मनी या दोन्ही देशांना बोस्नियामध्ये झालेल्या ऑस्ट्रियाच्या युवराजाच्या खुनाचा आळ सर्बियावर टाकून तो देश घशात घालायचा होता, तसेच रशियन रेल्वे पूर्ण होण्यापूर्वी फ्रान्स आणि रशिया या दोन्ही देशांशी युद्ध करून त्यांचा पराभव करायचा होता. युवराजाच्या खुनाचे कारण पुढे करून त्यांनी सर्बियन लोकांना जन्मभर आठवण राहण्यासारखा धडा शिकवण्याचे ठरवले! ऑस्ट्रिया व सर्बियादरम्यान छोट्या प्रमाणावर सुरू झालेले हे युद्ध त्या दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण युरोपभर पसरले. तसेच पुढे युद्धाची खुमखुमी, युद्धग्रस्त देशांना पाठिंबा आणि विरोध अशा इतर अनेक कारणांमुळे त्या युद्धात तुर्कस्तान, इटली, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका आदी देशांचाही प्रवेश झाला.
please login to review product
no review added