हिटलरच्या महत्त्वाकांक्षेतून सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात फिनलंडवर रशियाने केलेली स्वारी, जर्मनीने नॉर्वे, हॉलंड, बेल्जियमवर केलेली स्वारी याचं तपशीलवार वर्णन या पुस्तकात वाचायला मिळतं. वेगवेगळे देश या युद्धात कसे सामील होत गेले, ते युद्ध कशा तऱ्हेने झालं, कोणाची सरशी झाली, कोण हरलं, त्या त्या युद्धाचे त्या त्या देशावर, बेटावर किंवा एखाद दुसऱ्या शहरावर काय परिणाम झाले, याचं सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं गेलं आहे. त्याबरोबरच या युद्धाशी संबंधित प्रमुख व्यक्ती (जर्मनचा राष्ट्राध्यक्ष हिटलर, इटलीचा पंतप्रधान मुसोलिनी, इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन इ.) त्यांच्या स्वभावानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्यांनी त्या त्या वेळी घेतलेले निर्णय आणि त्यांचे झालेले चांगले वाईट परिणाम याचेही उल्लेख वेळोवेळी येताना दिसतात. सागरी लढाई, विमानातून झालेली लढाई, जमिनीवरील लढाई अशा तीन प्रकारे झालेल्या लढाईचे आकडेवारीनिशी संदर्भ दिले आहेत.
please login to review product
no review added