वाळूच्या किल्ल्याचं अस्तित्व केवळ क्षणभंगूर असतं, पण एका चिमुरडीसाठी ते शाश्वत ठरविण्याची धडपड करावी लागते...... हणमंताचं वागणं हे केवळ वेडसरपणा नाही, तर ते एक क्रौर्य आहे...... अनिकेतला कळून चुकलं की, आता काही घडणार नाही; आषाढ, श्रावण, आश्विन, कार्तिक... सगळं सारखंच....पहिलवान गड्यांनाही न जुमानणाऱ्या एका खोंडापुढे तेरा वर्षांची लिलू धिटाईनं उभी राहिली,त्या दोघांमधलं नातं खास होतं....एका राजाला व्याधिमुक्तीसाठी वैद्याच्या औषधांपेक्षा एक 'धक्का' रामबाण उपाय ठरला.... 'वाळूच्या किल्ल्या'सारखा असणारा मानवी भावभावनांचा हा बंध... आपल्या सजग लेखणीतून 'तात्यांनी' साकारला आहे.
please login to review product
no review added