१९४२ च्या धगधगत्या कालखंडात साताऱ्याच्या भूमीमध्ये 'प्रतिसरकार' (पत्रीसरकार) स्थापन करून ब्रिटिशांची झोप उडवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा.क्रांतिसिंह – एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, - डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या, महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी. त्यांचे लोभस, रांगडे व्यक्तिमत्त्व, मातीतून आकारलेले नेतृत्व, मुलखावेगळे कर्तृत्व यांचा शोध घेणारी, कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली 'क्रांतिसूर्य'.
please login to review product
no review added