जेव्हा...मनाला भुरळ घालणारे 'जांभळाचे दिवस' लवकर संपतात,टेकडीचा 'उतार' उतरायलाही वामनरावांना फार वेळ लागतो, पोस्टमनच्या 'अनवाणी पायांना वहाणा मिळतात, मनात आणि घरात कोणालाही शिरकाव करू न देणाऱ्या 'बाई' बदलतात, मर्यादशील वंचा बाजारची वाट चालताना मन मोकळे करते, विस्मृतीत गेलेले प्रेम 'सकाळची पाहुणी' बनून अनंतरावांकडे येते, ओढग्रस्त परिस्थितीत मुलासाठी घेतलेली 'सायकल' हरवल्यानंतरही काळे मास्तर सुटकेचा निःश्वास सोडतात, तेव्हा...काय घडते? या अनुभूतीचा अवीट बहर म्हणजेच 'जांभळाचे दिवस.'
please login to review product
no review added