शेतीच्या नांगरणीसाठी चांगला बैल मिळावा म्हणून बाप्पाजी आपण चार-चार बाजार पालथे घालता! परंतु, आपल्या मुलीसाठी वर बघायच्या वेळी कशी डोळेझाक करता? स्वतः फसता आणि आपल्या लाडक्या लेकीचं भवितव्यही अंधारात लोटता! काकूने आंबीच्या भवितव्याबद्दल उपस्थित केलेला गहन प्रश्न. आजचे प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनी वयाच्या सतराव्या वर्षी लिहिलेली स्त्री प्रश्नांवरची पहिली कादंबरी, जी त्याच वेळी शासनाच्या साहित्य-संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेमध्ये प्रकाशित झाली होती. घरंदाज, सुशील आंबूताईचा असा कोणता गुन्हा होता की तिला आपल्या ऐन तारुण्यात दुःखाच्या वाळवंटाला सामोरं जावं लागलं. त्यातून जिद्दीने उभ्या राहिलेल्या आंबी नावाच्या तरुणीची ही संघर्षमय कहाणी! या वेधक व विचारप्रवर्तक दुर्मिळ कादंबरीची खास नवी आवृत्ती.
please login to review product
no review added