मी रेषांकडे केव्हा, कसा वळलो ? आज आठवतं ते इतकंच की, लहान वयातच वळलो.शब्दांकडे वळण्याआधी रेषांकडे वळलो. घरात कोणी चित्रकार नव्हते. कोणामुळे हा नाद लागला? काही सांगता येत नाही.आठवणी उकरू लागल्यावर ध्यानात येतं की, ही आवड निर्माण व्हायला माझी आई थोडीफार कारणीभूत झालेली आहे.रांगोळ्या, गव्हा-तांदळांनी भरलेले चौक, रंगविलेले संक्रांतीचे घट. हिरवी पाने, नारळ, सुपाऱ्या, खणांच्या घड्या, काचेच्या बांगड्या,बुक्का, गुलाल, हळद-कुंकू, चैत्रगौरी, त्यांच्यापुढची आरास, सारवलेल्या अंगणात रेखलेली गौरीची पावले....आकृती, रंग, रेषा यांची किती विविध आणि सुंदर रूपं मला बघायला मिळायची! चित्रकलेचं माझं शिक्षण इथून सुरू झालं.
please login to review product
no review added