महात्मा गांधींनी आपल्या देशातून ब्रिटिश सत्ता घालवण्यासाठी या सत्तेवविरुद्ध अनेक आंदोलनं केली. १९४२ चं आंदोलन मात्र शेवटचं ठरलं. कारण या आंदोलनात ब्रिटिश सत्ता उलथवून लावण्यात त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अखेर यश आलं. परंतु हे आंदोलन गांधींच्या इतर आंदोलनापेक्षा वेगळं होतं. सत्याग्रह, उपोषण हीच गांधींच्या आंदोलनांची हत्यारं होती. जिंकू किंवा मरू हे या आंदोलनाचे घोषवाक्यच या आंदोलनाचं वेगळेपण दाखवतं. विशेष म्हणजे या आंदोलनाला एक असा नेता नव्हता. प्रत्येकजणच कार्यकर्ता आणि नेताही होता. या आंदोलनामुळे अनेक कार्यकर्ते पुढे नेते झाले. नंतर मात्र या सर्वांनी गांधींची मूळची विचारधाराच पुढेही चालवली,
please login to review product
no review added