• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Karkrog - Mahiti Aani Anubhav (कर्करोग- माहिती आणि अनुभव)

  Popular Prakashan

 138

 978-81-7991-966-8

 ₹100

 Paper Back

 198 Gm

 2

 1


गेल्या शंभर-दीडशे वर्षांत माणसाने वैद्यकशास्त्रात मोठी प्रगती केली आणि अनेक दुर्धर समजले जाणारे आजार काबूत आणले. परंतु कर्करोगावर मात्र अद्यापही माणसाला पूर्णपणे विजय मिळवता आला नाही. म्हणूनच कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांच्या मनात चिंता, भीती दाटून येते. तशात आपल्या समाजात या आजाराविषयी अज्ञान, अपूर्ण ज्ञान आणि गैरसमज असल्यामुळे मुळातली समस्या अनेक पटींनी वाढण्याची शक्यता असते. कर्करुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना कर्करोगाविषयी योग्य माहिती मिळावी आणि त्यामुळे त्यांना डोळसपणे व हिमतीने आजाराला सामोरे जाता यावे या हेतूने डॉ. सुलोचना गवांदे यांनी 'कर्करोग माहिती आणि अनुभव' या पुस्तकाचे लेखन केले आहे.या पुस्तकाचे दोन भाग असून पहिल्या भागात, कर्करोग म्हणजे काय, भारतात प्रामुख्याने आढळणारे कर्करोगाचे प्रकार, कर्करोगांवरचे उपचार आणि त्यांत झालेले प्रगत संशोधन ही माहिती दिली आहे. कर्करोग होण्याची काही कारणे अद्यापही अज्ञात असली तरी बहुताश रुग्णांमध्ये चुकीची जीवनशैली, व्यसनाधीनता ही कर्करोग होण्याची प्रमुख कारणे आहेत. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तंबाखू, धूम्रपान, मद्यपान यांसारखी व्यसने टाळून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार केला तर बऱ्याच अंशी कर्करोगाला थोपवणे शक्य आहे, हा विचार सर्वसामान्यांच्या मनात रुजवणे हे या लेखनामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.'अनुभवाचे बोल' या दुसऱ्या भागात डॉ. गंवादे यांनी अनेक कर्करुग्णांचे आणि त्यांच्या नातलगांचे अनुभव दिले आहेत. हे अनुभव कर्करुग्णांचे आणि त्यांच्या जीवलगांचे मनोधैर्य वाढवणारे, त्यांच्यात आश्वासक आणि सकारात्मक जाणीव निर्माण करणारे आहेत.पुस्तकाच्या शेवटी दिलेली कर्करोगावर उपचार करणाऱ्या महाराष्ट्रातल्या इस्पितळांची आणि समुपदेशकांची यादी वाचकांना उपयुक्त ठरावी. डॉ. सुलोचना गवांदे यांनी टाटा हॉस्पिटलच्या कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये एम. एस्सी. व पीएच. डी. या पदव्या मिळवण्यासाठी संशोधन केले. त्याकरता त्यांनी रक्ताच्या कर्करोगाचा, विशेषत: त्यातल्या अनिर्बंध वाढणाऱ्या पेशींच्या गुणधर्माचा अभ्यास केला होता. त्यानंतर १९८६ मध्ये त्या पुढील संशोधनासाठी अमेरिकेत गेल्या. तिथल्या विद्यापीठातून अनुभव घेऊन साधारपणे वीस वर्षांपूर्वी त्यांनी कर्करोगावरची औषधे तयार करणाऱ्या फार्मा कंपनीत काम करायला सुरुवात केली. सध्या त्या एका जपानी कंपनीमध्ये कार्यरत आहेत. एफडीए (FDA) आणि जगातल्या इतर औषध नियामक (regulatory) संस्थांना कंपनीची औषधे व प्रयोग याबद्दल द्यावयाची माहिती एकत्रित करणे, ही त्यांच्यावरची मुख्य जबाबदारी आहे.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update