प्रत्येक समाजाचे सांस्कृतिक वैभव दाखविणाऱ्या काही गोष्टी असतात. पु. ल. देशपांडे हे आपले सांस्कृतिक वैभव आणि त्यांची बटाट्याची चाळही! चाळीचे हे पुस्तक आले आणि त्या नंतर त्याच्यावर आधारित नाट्यप्रयोग. हा प्रयोग पाहण्यासाठी मुंबईत तीन-तीन तास रांगेत उभे राहून तिकिटे काढत, अशा आठवणी सांगितल्या जातात. पुलंच्या या चाळीत वाचकांनी आणि प्रेक्षकांनीही स्वतःला शोधले. सांस्कृतिक चळवळ, सांस्कृतिक शिष्टमंडळ, निष्काम साहित्यसेवा, गच्चीसह-झालीच पाहिजे अशा एकूण १२ प्रकरणांमधून ही चाळ उभी राहते. सूक्ष्म निरीक्षणशक्तीने रंगविलेली चाळीतील व्यक्तीचित्रे मनमुराद हसवितात.
please login to review product
no review added