• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Meluhache Mrutyunjay (मेलुहाचे मृत्युंजय )

  Ameya Prakashan

 487

 978-93-81626-64-1

 ₹295

 Paper Back

 370 Gm

 2

 1


"या पुस्तकाने मला खिळवून ठेवले" - प्रल्हाद कक्कर "अत्यंत उत्त्कंठावर्धक" - अनिल धारकर एका व्यक्तीची विलक्षण कथा. त्याच्याविषयाची दंतकथेने त्याला देव बनवून टाकले. ख्रि. पू. १९०० या काळात आधुनिक भारताची ओळख सिंधु संस्कॄती अशी होती. त्या काळातील रहिवासी त्याला मेलुहाची भूमी म्हणत होते. कित्येक शतकांपूर्वी प्रभू रामाने या परिपूर्ण संस्कॄतीची निर्मिती केली होती. पवित्र सरस्वती नदीचे पात्र हळूहळू कोरडे होऊन लुप्त झाल्यामुळे एके काळची स्वाभिमानी संस्कॄती आणि सूर्यवंशींचे साम्राज्य धोक्यात आले. पूर्वेकडे असलेल्या चंद्रवंशींच्या साम्राज्याला प्रदेशातून त्यांच्यावर अनेक विघातक दहशतवादी हल्लेही झाले. याशिवाय आणखी वाईट गोष्ट म्हणजे चंद्रवंशींनी नागा लोकांशी हातमिळवणी करून हे हल्ले केल्याचाही सूर्यवंशींच्या समज झाला. नागा जमात ही शारीरिकदॄष्टया अपंगत्व किंवा विचित्रपणा असलेल्या लोकांची बहिष्कॄत ठरलेली जमात होती. त्यांच्याकडे वैयक्तिक संरक्षणाची आणि लढाईची उत्तम कौशल्ये होती. त्यावेळी सूर्यवंशींना एका प्राचीन दंतकथेचाच आधार होता. ज्या वेळी दुष्टांची दुष्कत्ये अखेरच्या सीमेपर्यंत पोहचतात, सारे काही संपल्यासारखे वाटू लागते, ज्यावेळी शत्रूचा विजय झाला असे वाटू लागते, त्यावेळी त्या युगाचा नायक अवतरतो. तिबेटहून स्थलांतरित म्हणून आलेला धसमुसळा, आडदांड शिव हाच तो नायक होता? पण मुळातच नायक बनण्याची त्याची इच्छा होती का? कर्तव्य आणि प्रेम यांमुळे अचानक आपल्या नियतीकडे ओढला गेलेला शिव सूर्यवंशींच्या सुडासाठीच्या युद्धाचे नेतॄत्व करून दुष्टांचा संहार करेल का? शिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक आहे. आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वत:ला महादेव म्हणजेच देवांचेही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा! "अमिश... पूर्वेच्या पाऊलो कोएल्हो बनत आहे." - बिझनेस वल्र्ड "द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा" लवकरच आसामी, गुजराती, हिंदी, मल्याळी मध्येही उपलब्ध होणार.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update