प्रियंवद यांच्या कथांना स्वतःचा असा एक काळ आहे. कवितेचा एकएक पदर उलगडावा अशा धाटणीच्या ह्या कथा असल्याने, यातील पात्रांच्या नातेसंबंधांतील 'दाट धुक्याची भिंत' भावस्पंदनांचा प्रत्यय देते. तो देत असतानाच ती एकीकडे एकूणच माणसांच जीवन, त्याचं जगणं, वातावरण, व्यवहार , कमावण्या-गमावण्याची गणितं सहजपणे समोर मांडते. असं लेखन विरळाच! प्रियंवद यांच्या लेखनाची शैली आणि अभिव्यक्ती त्यांच्या प्रगल्भतेची, संवेदनशीलतेची आणि मानवी जीवनाबद्दलच्या आस्थेची साक्ष देते. त्यामुळे या कथांमधील गूढतेची आंतरलय वाचकमनाचं अवकाश दीर्घकाळ व्यापून राहते
please login to review product
no review added