विख्यात हिदुत्ववादी विचारवंत डॉ ब ल वष्ट यांचे संघ आणि सावरकर विषयक लेखन प्रस्तुत ग्रंथात डॉ जयंत वष्ट यांनी संपादित केलेले आहे. या लेखनाचे महत्व व आजच्या काळातली त्याची उपयुक्तता लक्षात घेत प्रा. शेषराव मोरे यांनी विवेचक- विश्लेषक प्रस्तावना लिहिली आहे. संघ आणि सावरकर या बाह्यत: एकमेकींशी काहीशा छेद देणाऱ्या वाटल्या तरी अंतत: एकाच ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या विचारधारा आहेत. प्रस्तुत ग्रंथामुळे याचा एक नीरक्षीर विवेकच वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. विद्यमान परिस्थितीत हिंदुत्व विचाराबद्दल सर्वांगाने विचार होण्याची, निर्माण झालेली गरज या ग्रंथाने भागवली जाणार आहे.
please login to review product
no review added