• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Aghpat (अघ: पात)

  Vardha Prakashan

 528

 

 ₹470

 Paper Back

 520 Gm

 1

 1


कादंबरीतील उल्लेख पाहून ही कादंबरी हजारोवर्षापुर्वी मध्यप्रदेशात घडली असावी कारण यात विध्य पर्वत व अवंतीनगरी यांचे उल्लेख आहेत. कादंबरीची सुरुवातच कारागृहाच्या वर्णनाने होते. कादंबरीत कुसुमपूर या शहराचे वर्णन आहे. कादंबरीत कालजित हा खलनायक सर्वत्र दिसतो. उपोद्घातापासूनच त्याची कृष्ण्कृते चालू झालेली दिसतात. लेखकाने भगवद गीतेच्या १६ व्या अध्यायातील दैवीसंपत्ती आणि आसुरी संपत्ती या कल्पनेचा वापर जागोजागी केला आहे. कालजित हा या कादंबरीचा खलनायक असून मरुभूती , सिंहरव, सरस्वती कुमुदिनी,रुपलता ही सर्व पात्रे दैवी संपत्तीने युक्त आहेत. दातारांच्या सर्वच कादंबऱ्याप्रमाणे याही कादंबरीत द्वंद्व युद्ध आहेत. च्मेप्रकरणे आहेत रहस्यमय दुर्ग आहेत व वेशांतरेही आहेत. कादंबरी वाचायला लागल्यानंतर तुम्ही कादंबरीतील कथानकाशी समरस होतो व त्यातील एक भाग बनता. दृष्टांचा अधःपात होणार हे तत्व येथे गृहीत धरलेलेच आहे. जुन्या पद्धतीनुसार या कादंबरीला उपोद्घात व उपसंहार असून उपसंहार हिमालयासारखे जेथे ज्वालामुखीचे स्थान आहे त्याच्या आसपास घडतो. ब्रह्मराक्षस शेवटी कालजिताच्या अधःपाताबद्दल त्याला अग्निकुंडात फेकून शिक्षा करतो व कादंबरी संपते.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update