शंकर पाटील यांच्या लेखनातून कथारूपाने आपल्या डोळ्यांपुढे येणारे अनुभव खेड्यांतील स्त्रीपुरुषांचे आहेत व त्या दृष्टीने त्यांना त्यांचे असे खास धर्म प्राप्त झालेले आहेत. हे त्यांचे विशेष धर्म नेमके लक्षात घेऊन त्यांना शब्दरूप देण्याची शक्ती लेखकाच्या ठिकाणी आहे. एखाद्या अनुभवाची नेमकी प्रकृती लक्षात घेणे व ती प्रगट होईल असे शब्दरूप त्याला देणे ही गोष्ट सोपी नव्हे. पाटील यांच्या कथांमधून खेड्यांतील स्त्रीपुरुषांचे हे अर्थपूर्ण अनुभव त्यांच्या विशेष धर्मासह विलक्षण प्रत्ययकारकपणे व्यक्त होतात व त्या अनुभवांना त्यांचे असे अनन्यसाधारणत्व लाभते. खेड्यातील सुखदु:खात्मक अनुभवसृष्टीला या कथांमध्ये एक आगळाच रूपगंध येतो. –वा. ल. कुलकर्णी
please login to review product
no review added