• +91 9082381814
  • support@mylibrarywala.com

Attention : Books ordered after 7 PM will be delivered a day after

Vakyakosh Bhag 2 (वाक्यकोश भाग २)

  Rajhans Prakashan

 571

 81-7434-285-0

 ₹250

 Paper Back

 970 Gm

 1

 1


मराठी भाषेला अपरिचित असलेली phrasal verb ही संकल्पना इंग्रजी भाषेचे भूषणभूत वैशिष्टय आहे. एखाद्या क्रियापदासोबत एखादे शब्दयोगी अव्यय किंवा एखादे क्रियाविशेषण किंवा एकाच वेळी ही दोन्ही अव्यये वापरल्याने जे एक बहुपदी क्रियापद अस्तित्वात येते त्याला इंग्रजीत phrasal verb म्हणतात. ते एक स्वतंत्र क्रियापद असून अर्थदृष्टया मूळ क्रियापदाहून वेगळे असते. उदाहरणार्थ, १. Come म्हणजे येणे, पण come about म्हणजे होणे किंवा घडून येणे. मसुद्यात इतक्या चुका कशा झाल्या ते लिपिक सांगू शकला नाही. The clerk couldn’t tell how so many mistakes came about in the draft. २. Get म्हणजे मिळणे किंवा मिळवणे, पण get back म्हणजे (विशेषे-करून स्वत:च्या घरी) परत येणे. ती काल रात्री खूप उशिरा (घरी) परत आली. She got back very late last night. ३. Give म्हणजे देणे, पण give out म्हणजे संपुष्टात येणे, संपणे. आपला धान्यसाठा दोन आठवडयानंतर संपेल. Our food supplies will give out after two weeks. ४. Go म्हणजे जाणे, पण go-down म्हणजे किमती वगैरे उतरणे किंवा कमी होणे. तयार कपडयांच्या किमती गेल्या महिन्यात अचानकपणे उतरल्या. The prices of ready-made clothes (or garments) suddenly went down last month. ५. Hang म्हणजे टांगणे, पण hang back म्हणजे इतर सगळे निघून गेल्यावर मागे थांबून राहणे. सभा संपल्यावर अध्यक्षांना प्रश्न विचारण्यासाठी ती मागे थांबून राहिली. After the meeting, she hung back to ask the chairman a question. प्रत्येक phrasal verb मधील घटक एकमेकांशी सहयोग करून एक नवीन क्रियापद सिध्द करतात. म्हणनूच इंग्रजीतील phrasal verb ह्या संकल्पनेसाठी मराठीत ‘सहयोगी क्रियापद’हा प्रतिशब्द वापरला आहे. प्रस्तुत कोशात पाच हजारांहून अधिक सहयोगी क्रियापदांचा समावेश केला असून त्यांच्या स्पष्टीकरणासाठी मराठी वाक्ये रचून त्यांची इंग्रजी भाषांतरे सादर केली आहेत. सहयोगी क्रियापदे भौतिक घटनांची तसेच मनुष्याच्या अगणित कृतींची व अनुभवांची अभिव्यक्ती अचूकपणे व प्रभावीपणे करतात. ह्यातच त्यांची उपयुक्तता सामावलेली आहे.

please login to review product

no review added

Newsletter

Subscribe to our newsletter and get latest Update