डॉ.ब्रायन वेस नावाच्या मानसोपचारतज्ञाची आणि त्यांच्याकडे रुग्ण म्हणून आलेल्या कॅथरीन नावाच्या तरूणीची ही सत्यकथा आहे.सुमारे अठरा महिने उपचार केल्यानंतरही कॅथरीनचा आजार काही बरा झाला नाही;म्हणून डॉ.ब्रायन यांनी तिच्यावर संमोहनाचा प्रयोग केला.या संमोहनावस्थेत कॅथरीनला मागील जन्मातील कटू आठवणींमध्येच तिच्या वर्तमानातील आजाराची कारणे दडलेली होती.कॅथरीनच्या कटू स्मृती नष्ट करत असतानाच मृत्यूनंतरचे जीवन,आत्मा,परमात्मा यांचे व्यवहार याविषयीचे गूढ डॉक्टरांना उलगडले.जीवनाविषयी शाश्र्वत सत्य सांगणाऱ्या या अमूल्य संदेशांमुळे कॅथरीन पूर्णपणे बरी झालीच झाली,त्याच बरोबर डॉ.ब्रायन यांचाही कायाकल्प झाला.असाच कायाकल्प तुमच्या-आमच्यातही व्हावा...याहेतूने डॉ.ब्रायन यांनी सत्यकथा शब्दबद्ध केली.
please login to review product
no review added