एक साक्षात धगधगती अग्निरेखा - चापेकरांच्या फाशीतून फुललेली, पेटलेली; त्यांचे अपुरे कार्य चालवण्याच्या शपथेने तेजाळलेली; हौतात्म्याचा अनावर ध्यास जोपासणारी. या ध्यासातूनच सावरकरांना ’स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हा महान्मंगल मंत्र स्फुरला. या मंत्राच्या सिध्दीसाठी त्यांनी ’अभिनव भारत’ या क्रांति-संघटनेची संस्थापना केली. सावरकर लंडनला गेले, तेही त्यासाठीच. तेथून त्यांना अंदमानच्या उदासवाण्या एकलकोंडीत अंधारबध्द व्हावे लागले - अर्धशतकाची शिक्षा सोबतीला घेऊन. तरीही या अग्निरेखेची धग किंचितही ओसरली नाही. अदम्य आत्मबलाच्या आधारावर ती धगधगतच राहिली. सावरकरांच्या दिव्यदाहक क्रांतिव्रताची ही भव्योत्कट चरितकहाणी.
please login to review product
no review added