संगीता धायगुडे यांचा एकूणच जीवनप्रवास एक ' हुमान' - कोडे आहे. नियतीने घातलेले.'आंधळी' गावच्या एका डोळस मुलीचे हे आत्मकथन! केवळ शिक्षणाच्या बळावर, आपल्या परिपक्व प्रतिभेच्या सामर्थ्यावर त्या जीवनात आलेले असह्य धक्के पचवू शकल्या. हा त्यांचा मानसिक प्रवास केवळ थक्क करणारा आहे. 'हुमान' ला मानवीपणाचा स्पर्श आहे. जे जरी घडले, ते घडताना मनावर जे संस्कार उमटले... जे ओरखडे उमटले....ते तसेच सांगण्याचा प्रयत्न संगीता धायगुडे यांनी केलेला आहे. ' हुमान' एखाद्या लोलकाप्रमाणे आपल्यासमोर फिरत राहते. सुंदरता हि केवळ कल्पना असू शकेल.. पण आयुष्य हे केवळ एक अनाकलनीय कोडेच नाही, तर कल्पितापेक्षा सुंदर आहे.. याचे प्रत्यंतर 'हुमान' ने घडवलेले आहे. एकाच वेळी ते मनाला चटका लावणारे... मनाची पकड घेणारे ... कोडे घालणारे.... आणि कोड्याची उकल करणारे असे झाले आहे.
please login to review product
no review added