शिरीष कणेकर हे नाव वाचकांना, विशेषत: चित्रपटषौकीन रसिकांना चांगलच परिचयाचं आहे. हिंदी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपट संगीत हे कणेकरांच्या खास आवडीचे, कुतूहलाचे विषय आहेत. हिंदी चित्रपट, त्यातले कलावंत, त्यांचा अभिनय यावर कणेकर वर्षानुवर्ष उत्कट प्रेम करीत आले आहेत. ‘यादों की बारात’ हे कणेकरांचं नवीन पुस्तकही हिंदी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपट संगीत या विषयांनाच वाहिलेलं आहे. पण त्याबरोबर या पुस्तकात आणखीही एक गोष्ट प्रामुख्यानं आढळते. हिंदी चित्रपतसृष्टी - मधल्या जवळजवळ गेल्या तीन पिढ्यातले अनेक लहान - मोठे, यशस्वी - अयशस्वी, नामवंत - अनामिक अभिनेते व अभिनेत्री यांची अतिशय हृदयंगम आणि हृदयस्पर्शी शब्दचित्रे कणेकरांनी इथं मोठ्या तळमळीनं आणि जाणकारीनं रेखाटली आहेत. कणेकरांची ही ‘यादों की बारात’ आपलं चित्त वेधून घेते यात शंका नाही. शिरीष कणेकरांच्या या ‘यादों की बारात’ चं मी मन:पूर्वक स्वागत करते. - लता मंगेशकर
please login to review product
no review added