ना हि उमाटे यांचा ' आभाळ कोसळलय हा कथासंग्रह ग्रामीण जीवनातील सल नेमकेपणाने मांडतो. मुळात आज ग्रामीण जीवन ' सली' चेच झालेले आहे. वेदनांचे ठसठसलेपण घेऊन ग्रामीण माणूस जगतो आहे. परंपरा आणि नवता अशा नव्या संघर्षातून वाट हुडकताना त्याचं कासावीस होण कथालेखक उघड्या डोळ्यांनी पाहतो. परिस्थितीन हैराण झालेली माणस कथालेखाकाचा लेखन विषय होतात. आभाळ कोसळल्यागत सर्व बाजूनी कोसळणारी दु:ख हे इथल्या कष्टकऱ्यांच पूर्व प्राक्तन आहे. हे असं असल तरी नशिबाच्या मुसक्या बांधून व मनगटातला पुरुषार्थ जागवून हि माणस धीटपणान जगण्याला बाहेरबाधा, भुताटकीची जळमट चिकटलेली असली तरी टी झटकून टाकण्याची सिद्धताही ह्या माणसांनी अबाधित ठेवलेली आहे. उमाटे यांची कथा हे सारे कमालीच्या सामर्थ्याने टिपते. बोलीभाषेतील सहजता हा या कथेचा लक्षणीय विशेष ठरावा. त्यामुळे कथा साजिवंत होते. लेखकाच्या सहप्रवासास हार्दिक शुभेच्छा! - जगदीश कदम
please login to review product
no review added