एका स्त्रीच्या आयुष्याचा खरं तर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास ही कादंबरी रेखांकित करते. आयुष्यात अनेक नात्यांनी जवळ आलेल्या नि दुरावलेल्या पुरुषांच्या सहवासात केवळ पुरुषांच्याच नव्हे, स्त्रियांच्याही सहवासात होरपळलं जाणं, हेच यातील नायिकेचं भागधेय. पण जितके कोसळणं तितकीच कणखरपणे उभं राहण्याची अखंड धडपड करत स्वतःचं घडणं--स्वत्वाच्या हुंकारातून घडवतच राहणं... पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावाखाली आजदेखील चालूच असलेली स्त्री मनाची फरपट. अंत ना आरंभही'सारखी तिच्या जीवनव्यथेची ही यात्रा. म्हणूनच या कादंबरीतील नायिकेचा चेहरा फक्त तिच्या एकटीचाच नाही. त्यात अनेक स्त्रियांचे चेहरे प्रतिबिंबित झालेले दिसतील.अंबिका सरकार यांनी मोजक्याच पण लक्षणीय कथा लिहिल्या. एका खासाचे अंतर' ही त्यांची पहिली कादंबरी वाचकप्रिय ठरली. बऱ्याच वर्षांनी लिहिलेली ही दुसरी कादंबरीही साध्या, सरळ निवेदनातून आणि आत्यंतिक उत्कटतेने उलगडत गेल्यामुळे वाचकांना निश्चित भावेल.
please login to review product
no review added