साहित्याला `कांचनाचं` म्हणजे सोन्याचं मोल देणाऱ्या शिवाजी सावंत (`मृत्युंजय`कार) यांच्या विविध ललित लेखांचा हा भावसंच. खास त्यांच्या लेखनशैलीतील. अभिजात मराठी भाषेची जागोजाग भेट घडविणारा. या संचात छ. शिवराय व वीर थोरले बाजीराव पेशवे यांच्या विक्रमी, तशाच, भावसमृद्ध जीवनाच्या तळवटाला केलेला हळुवार स्पर्श भेटेल. आ. अत्रे, अण्णा (ग.दि.मा.) व अमरकीर्त, थोर संगीतकार वसंत देसाई यांचे त्यांना लाभलेले अनमोल आशीर्वाद दिसतील. तसेच, एरव्ही दुर्लक्षित गोदी कामगाराला सच्चा जीवनार्थ प्राप्त करून देणारे झुंजार व लढाऊ नेते भाई मनोहर कोतवाल यांच्या विविध जीवनछटा दिसतील. विशेषत: ज्ञानेश्वरांवर भावएकरूपता साधून बांधलेला, `विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले!` व `एकतरी ओवी अनुभवावी!` असे दोन लेख आहेत. ते तर शांत चित्ती चवीनं चाखण्यासारखे आहेत. साहित्य सोनियाची समृद्ध खाण असलेल्या मायमराठीत हे `कांचनकण` अलवार हातांनी उचलून ठेवावेत, असे वाचकांनाच वाटेल.
please login to review product
no review added