रंगपंचमी साजरी होते ती त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे, विविध रंगांच्या उधळणीमुळे. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे आपल्याला सामील होतात. आपल्या आयुष्याला बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला ही माणसेच हातभार लावतात; प्रत्येकाचे रंग निराळे, मग हे रंग कधी शहाणपणाचे असतात, कधी वेडेपणाचे, कधी उत्साहाचे; तर कधी नैराश्याचे. वपुंची त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या-छोट्या प्रसंगांनी सजलेली ही ‘रंगपंचमी’ कुठेतरी ‘आपल्याही आयुष्यात असं घडलं होतं बरं का’ असं म्हणायला लावते. हसवते. खिन्नता आणते, विचारही करायला लावते.
please login to review product
no review added