आपल्या देशात आरमारी सामर्थ्याचे महत्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. त्यांच्या निधनानंतर ' बलाढ्य आरमार' हे त्यांचे सूत्र धरून कान्होजीनी सागरी सत्तेवरची मराठेशाहीची पकड इतकी बळकट केली की त्यांचा हा पराक्रम चमत्कारात गणला जावा. हिंदवी स्वराज्याचे शिवछत्रपतींचे स्वप्न पाहण्याची दृष्टी नसलेल्या आपमतलबी स्वकीयांशीही कान्होजीना झुंजावे लागले. दिल्लीच्या तक्तावर औरंगझेबासारखा धर्मांध आरूढ झालेला, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज यांची पाळेमुळे खोल जायला लागलेली, छत्रपतींच्या सिंहासनाला कौटुंबिक कलहाणे तडा गेलेला अशा विपरीत कालखंडात आपले सर्वस्व पणाला लावून पश्चिमसागरावर मराठेशाहीची हुकुमत असल्याचे सिद्ध करणारा हा पराक्रमी पुरुष.
please login to review product
no review added