या पुस्तकातील बहुतांश लेख हे अंबर मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. खर तर अंबर मुळेच आम्ही लिहिते झालो. त्यामध्ये श्री सुरेश साखवळकर ह्यांची प्रेरणा होती. आमच्यावर त्यांनी विश्वास टाकला ,ठिकठिकाणी अंबर तर्फे जाण्यास उत्तेजन दिले. काही विशेष व्यक्तीमत्वांच्या मुलाखती घ्यायला सांगितले. त्याचबरोबर काही अप्रकाशित लेखही या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. अनुभवलेली अमेरिका पत्रारुपात सादर केली आहे. हा सगळा हौसेचा मामला आहे.आमचा विस्तारित परिवार, अनेकविध क्षेत्रातील स्नेहीमंडळी, ह्या सगळ्यांना पुस्तकरूपाने भेटावे, एवढेच माफक उद्दिष्ठ, एवढाच आमचा लेखन-प्रपंच!
please login to review product
no review added