‘प्रज्ञा आणि प्रतिभा’ (भाग-२) हा वि.स.खांडेकरांचा प्रातिनिधिक समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. यात एकूण एकवीस समीक्षात्मक लेख आहेत. ‘सरस्वती मंदिरातील दिवाणी दावा’ या लेखातून खांडेकर मराठी भाषेची बिनतोड वकिली करतात, तर अव्वल इंग्रजी कालखंडानंतर मराठी भाषा व साहित्यास स्वबळ व स्वचेहरा प्राप्त कसा झाला, ते ‘लघुकथा’ आणि ‘मराठी लघुकथा’ या दोन लेखांतून स्पष्ट करतात. तसेच त्यांच्या स्वत:च्या ‘ययाति’, ‘उल्का’, ‘कांचनमृग’ या कादंबऱ्यांवरही त्यांनी लेख लिहिले आहेत. साहित्य संमेलनांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. तर हे सगळेच लेख खांडेकरांची काव्य-शास्त्र-विनोदाची जाण, त्यांची अभ्यासू, स्वागतशील वृत्ती, मराठीविषयीचं प्रेम, त्यांचा दांडगा व्यासंग इ. गुणांचं दर्शन घडवणारे आहेत आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. ते अवश्य वाचले पाहिजेत.
please login to review product
no review added