शुभदा म्हणजे खरोखर आकाश झेलणारी गंगाच होती. हे करत असताना आलेल्या अनंत संकटांना तिनं आपल्या मजबूत खांद्यावर पेललं होतं. ग्रीष्मातल्या प्रखर सूर्यासारखी अनेक दाहक संकटे तिच्यासमोर एकापाठोपाठ एक उभी ठाकली होती; पण त्या सर्व संकटांवर मात करून तिनं आपल्या कर्तृत्वानं सुखाचं, कल्याणाचं, आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं. संकटांचं आकाश झेलून तिनं साठे परिवाराला सुखाची, समाधानाची सावली दिली होती. तिच्यात असलेल्या प्रत्येक गुणाचा कस लावून, कर्तृत्वाच्या कसोटीवर खरी उतरणारी शुभदा आता सर्वांना दिसणार होती सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं आकाश झेलताना! हेच तिच्या आयुष्याचं सार्थक होतं. हीच इतिकर्तव्यता होती.
please login to review product
no review added