व्यक्तिचित्र रंगवण्यात एक वेगळंच आव्हान आहे, एक वेगळीच किक आहे.हे आव्हान, ही किक मी मनापासून एंजॉय करतो. सर्कशीतल्या गोळ्यात फटफटी चालवण्याचं ‘थ्रिल’ या प्रकारच्या लिखाणात आहे. एकही वाक्य कक्षेबाहेर जाऊन चालतनाही. यात एक गंमत आहे. आधी त्या माणसाच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा आढावाघ्यायचा, आपल्याला त्यातली कुठली गोष्ट अधोरेखित करायची आहे याची मनाची खूणगाठबांधायची; मग आपल्या लेखनशैलीला कौल लावून ‘हरी ओम’ करायचं लिहिताना मध्ये मध्येथांबून सगळं नीट चाललंय ना, याची खात्री करुन घ्यायची. माझी तरी ही पद्धत आहे.
please login to review product
no review added