पुन्हा झुळूक १९८५ मध्ये ’स्त्री’ मासिकामध्ये सुरू झालेली माझी ’झुळूक’ ८७-८८ मध्ये ’पक्षिक माहेर’वरून सरकून गेली, तिचं हे संकलन. माझ्या वाचनातला बहुतेक मराठी विनोद शाब्दिक कसरतींच्या किंवा विशिष्ट व्यवसायांच्या विडंबनांच्या अंगाने जाणारा होता. यापलीकडे जाऊन सामान्य माणसांच्या दैनंदिन जगण्यालाच कुठे ना कुठे भिडणारा विनोद लिहिण्याचा प्रयत्न मी या सदराव्दारे केला. इतका विशाल पट ’झुळूक’मागे असल्यामुळे विषयांचा तुटवडा पडण्याचं काही कारण नाही. त्यामुळेच नुसत्या ’झुळूक’नंतर ही ’पुन्हा झुळूक’ वाचकांच्या हाती देताना ’आणखी झुळूक’, पुन्हा पुन्हा झुळूक’ वगैरेंची शक्यता नाकारता येत नाही. वाचकांना ही धमकी वाटणार नाही अशी आशा करते. - मंगला गोडबोले
please login to review product
no review added