मीना प्रभु त्या त्या प्रदेशांचा फक्त इतिहास-भूगोल सांगत नाहीत; तो संदर्भ साक्षेपाने स्वत:त रिचवून, त्या प्रदेशांची समग्र संस्कृती चित्रित करतात. त्या चित्रणात लेखिकेची मानवी जीवनाच्या विविध अंगोपांगांबद्दलची जिज्ञासा, विविध कलांचा आस्वाद घेणारी डोळस रसिकता, आणि निसर्गाची उत्कट ओढ हे विशेष प्रामुख्याने जाणवतात. लेखिकेने घेतलेला जिवंत, प्रेरक प्रवासानुभव-दोन्हीही-सहजसुंदर शैलीत व्यक्त होतात. मीना प्रभु यांचे प्रवासवर्णनांत त्यांच्यातील मुक्त, लोभस प्रवासिनीचे प्रतिबिंब उमटले आहे.
please login to review product
no review added