रणजित देसाई यांच्या प्रभावी लेखणीतून उतरलेला हा संग्रह माणसांच्या सर्व भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडवणारा आहे. रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. लेखनाच्या सुरुवातीच्या काळात कथांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जीवनाचा वेध घेतला. त्याच काळातला हा संग्रह. घराणं, इभ्रत, प्रतिष्ठा, गावकी, वैर या धाग्यांनी विणलेल्या कथा मनाच्या तळापर्यंत पोहोचतात. जिथं घराण्याची पत सांभाळण्यासाठी आपला जीव पणाला लावणारी माणसं, आप्तेष्टांच्या प्रेमापोटी सर्वस्व उधळणारी माणसं या कथांमधून भेटतात, तिथंच स्वार्थापोटी रक्ताच्या नात्यांना काळिमा फासणारी माणसंही भेटतात. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
please login to review product
no review added