एम. टी. आयवा मारू' कार श्री. अनंत सामंत यांची ही नवी कादंबरी. जहाजावरील विवक्षित विभागाच्या अधिकाऱ्याने केदार नाईकने साक्षात अनुभवलेले दर्यारंग इथे आहेत. जहाजावरील विभिन्न अधिकारी व कर्मचारीगण, त्यांची सत्तालालसा, त्यांचे विकारी जग, मुक्त भ्रष्ट आयुष्य आणि या साऱ्याकडे खूपशा तटस्थतेने पाहणारा जगू शकणारा केदार या कादंबरीत सामंत यांनी समरसतेने व नेकीने रंगवला आहे. त्याची वृत्ती, त्याचा पिंड, त्याची संघर्षशीलता आणि क्वचित त्याचे स्खलन येथे छान उमटले आहे. ‘एम. टी. आयवा मारू प्रमाणे हे लिखाणही उत्कट, सच्चे आहे. दर्यावरच्या निरनिराळ्या "रंगच्छटा येथे सामंतांनी वेधकपणे रंगविल्या आहेत.
please login to review product
no review added