समाधीमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांवर विज्ञानमय कोशाने जाऊन तेथील परिस्थिती प्रसिध्द करून ठेवली, नंतर अंतराळ्यानांनी अचुक असल्याचे दाखवल्यामुळे जागतिक कीर्ति लाभलेले. दिव्यदृष्टी असलेले आधुनिक साक्षात्कारी संत. प्राचीन विद्या व इतिहास यांचे संशोधक म्हणून मान्यता पावलेले. "स्वयंभू" - या पहिल्याच ग्रंथात भीमाचे नायकत्व आव्हानत्मकरित्या सिध्द करून महाभारतीय घटनांच्या तारखा ज्योतिर्गणिताने निश्चित ठरविणारे. "वास्तव रामायण" या ग्रंथात रामाचा व त्या पूर्वीचा मिळून पंधरा सहस्त्र वर्षांचा इतिहास देऊन रामायणातील घटनांच्या तारखा अचूकपणे ठरविणारे. "उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरुपण" - या स्वानुभवपूर्ण ग्रंथाने आध्यात्मिक अधिकार सिध्द करून आधुनिक ऋषी अशी मान्यता पावलेले. "पातंजल योग - विज्ञाननिष्ठ निरुपण" या स्वानुभूतिपूर्ण संशोधनात्मक ग्रंथाने योगशास्त्रावरील प्रभुत्व सिध्द करणारे. "गीता - विज्ञाननिष्ठ निरुपण" या ग्रंथामुळे गीतेच्या भाष्यकारांमध्ये स्थान मिळालेले. "ब्रम्हर्षीची स्मरणयात्रा"- या आत्मचरित्रात अध्यात्मविद्येचा आलेख देणारे. "पुनर्जन्म"- या ग्रंथामध्ये पुनर्जन्म सिध्दान्त व कर्म सिध्दांत आधुनिक शास्त्रीय भाषेत सिध्द करणारे. "ख्रिस्ताचे हिंदुत्व" हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करणारे. ब्रम्हर्षि व समाजभूषण या पदव्या देऊन समाजाने गौरवलेले. पुण्यातील प्रथितयश सर्जन डॉ. प. वि. वर्तक यांच्या लेखणीतून उत्स्फूर्तपणे उतरलेले थोरले बाजीराव पेशवे यांचे सत्य इतिहासावर आधारित नाट्य चरित्र.
please login to review product
no review added