मनुष्य दुष्ट नाही, असे नाही; पण त्याच्या दुष्टपणापेक्षा दुबळेपणातूनच बौद्धिक आणि आत्मिक दुर्बलतेतूनच आजच्या जगातली अनेक दु:खे निर्माण झाली आहेत. निसर्गाच्या सर्व प्रेरणा अंधपणाने मान्य करणारे आपले मन आणि मानवी संस्कृतीच्या प्रकाशरेखांवर प्रेम करणारे आपले मन यांच्या सनातन संघर्षाचे सत्य स्वरूप जाणण्याचे सामर्थ्य सामान्य मनुष्याच्या अंगी अजून आलेले नाही. विशेषत:, यंत्रयुगाच्या आणि त्याने निर्माण केलेल्या असंख्य प्रश्नांच्या पार्श्र्वभूमीवर मानवतेचे भव्य आणि सुंदर चित्र कसे रेखाटायचे, हे कोडे त्याला अद्यापि सुटलेले नाही. ते सुटेपर्यंतच्या संक्रमणकाळात जीवनावर अमंगलेतची दाट छाया पसरल्याचा भास आपल्यापैकी प्रत्येकाला होणे स्वाभाविक आहे.
please login to review product
no review added