दशावतार' हे पुस्तक म्हणजे कुमारांच्या तळहातावर ठेवलेला पौष्टिक मेवाच आहे. हा मेवा जितका स्वादिष्ट तितकाच शक्तिवर्धकही आहे. 'दशावतार' हा शब्द माठ्यांनाच काय छोट्यांनाही माहीत असतो; पण त्या प्रत्येक अवताराची कथा, त्या कथेमागील गूढार्थ कितीजण जारतात ? इथे लेखिका अनुराधा फाटक यांनी संवादपद्धतीतून बालगोपालांना विष्णुदेवाच्या दशावताराचे रहस्य सुबोध आणि रंजक रीतीने उलगडून दाखविले आहे प्रौढ वाचकालाही ते मोहीत करील! नीशिकार आणि धर्मसंस्कार अध्यात्मविद्या आणि विज्ञान गतकाल, वर्तमानकाल आणि कल्की यांचे पेड गुंफून लेखिकेने एक सुंदर संरचना सादर केली आहे. कुमारवाचकांच्या भिरभिरत्या मनास ही सजावट आणि हा खुराक समाधान आणि स्थिरता देईल!
please login to review product
no review added