‘विरामचिन्हे’ या कथासंग्रहानंतरचा प्रवीण दवणे यांचा हा दुसरा कथासंग्रह. मानवी मनातली गुंतागुंत... नात्यांचे हरवत जाणारे अन्वयार्थ, मुखवट्याआडची असह्य घुसमट हे सारे वास्तवाचे भान राखून तरल, काव्यात्मकतेने दवणे व्यक्त करतात. ‘तिचं आकाश’ म्हणूनच प्रातिनिधिक ठरतं. दवणे यांच्या अन्य काव्यात्मक ललितलेखनाप्रमाणे हा कथासंग्रहही मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारा ठरणार आहे.
please login to review product
no review added