कवी (1941) ही कादंबरी म्हणजे आधुनिक बांगला साहित्याची नांदी. 'ताराशंकरांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या निर्मळ वाऱ्याच्या झोताप्रमाणे बांगला साहित्यात उपस्थित झाल्या. रवींद्रविरोधकांच्या खोट्या आधुनिकतेला कंटाळलेल्या बाचकांना ताराशंकरांनी निर्माण केलेला अस्सल रक्तामांसाचा माणूस भावला. कवी कादंबरीचा नायक डोम समाजातील. त्याचे सारे कुटुंबीय दरोडेखोर, परंतु चोऱ्यामाया न करता निताई गाणी रचतो. त्याच्या आयुष्यातील लोकविलक्षण बदलांची, हे बदल कोणत्या आंतरिक प्रेरणेने स्वतःत सामावून घेऊन माणूस म्हणून समृद्ध होत जातो त्याची आणि या जीवनप्रवाहात त्याला भेटलेल्या वसंत या जहाल स्वभावाच्या करुण अंत होणाऱ्या झुमुरदलातील गायिकेची कहाणी. बंगालचे विशिष्ट प्रादेशिक जीवन आणि संस्कृती, वाराणसी नगरीतील गंगाकिनारी जन्ममृत्यूचा खेळ या साऱ्यांचे बहुमोल चित्रण या कादंबरीत अजरामर झालेले आहे.
please login to review product
no review added